शेततळ्यासाठी दोन लाखांपर्यंत मिळणार अनुदान!Shetkari Anudan yojana

Shetkari Anudan yojana: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरण्यासाठी अनुदान मिळणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेततळ्याच्या आकारानुसार किंवा प्रत्यक्षात खर्चाच्या 90% किंवा जास्तीत जास्त दोन लाखांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येत आहे.

Shetkari Anudan yojana
Shetkari Anudan yojana

योजनेचा लाभ मागेल त्याला शेततळे या योजनेबरोबरच इतर योजना अंतर्गत बांधलेल्या किंवा स्वखर्चाने तयार केलेले शेततळ्यांनाही लागू होईल.या सुविधेमुळे पाणी साठवणूक क्षमता वाढते. शेतीसाठी स्थिर आणि दीर्घकालीन सिंचन व्यवस्था उपलब्ध होणार असून ,त्यामुळे उत्पादन क्षमता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते.

योजनेचा उद्देश Shetkari Anudan yojana

योजनेचा मुख्य उद्देश अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे,हा या योजनेचा उद्देश असून यामुळे त्यांना दीर्घकालीन सिंचन सुविधा मिळतील तसेच त्यांचे आर्थिक स्थिती मजबूत होते.

शेतकऱ्यांना मिळणारे फायदे Shetkari Anudan yojana

शेततळ्यात पाणी साठवणूक करून वर्षभर शेतीसाठी सिंचन करता येत आहे.कोरड्या हंगामातील पिकांना पाण्याचा पुरवठा करता येतो.शेतीला सतत निरणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पिकांचे नुकसान टाळल्या जाते. शेततळ्यातील पाण्यामुळे पिकांची वाढ अधिक चांगली होते. उत्पादन वाढल्यामुळे विक्री आणि नफ्यातही वाढ होते.

योजनेचा अटी व पात्रता Shetkari Anudan yojana

लाभार्थी अनुसूचित जाती किंवा प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.दारिद्र्यरेषेखाली शेतकरी प्रथम प्राधान्य देण्यात येईल, सहा हेक्टर पर्यंत मर्यादा लागू असणार आहे.0.40 ते 6 हेक्टर दरम्यान शेत जमीन असणे आवश्यक दुर्मल भागातील 0.40 हेक्टर पेक्षा कमी जमिनीच्या शेतकऱ्यांनाही मिळून अर्ज करता येतो.एकदा लाभ घेतल्यास पुढील पाच वर्षे पुन्हा लांब मिळत नाही.याआधी असा प्रकारच्या गोष्टीचा लाभ घेतल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.

योजनेसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे Shetkari Anudan yojana

जातीचे प्रमाणपत्र ,बँक पासबुक ,शेतकऱ्याचा फोटो ,शेत जमिनीचा नकाशा स्वयंघोषणापत्र इत्यादी कागदपत्रे योजनेसाठी लागतात.

योजनेची निवड पद्धत Shetkari Anudan yojana

योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी कमाल ३० दिवसांचा कालावधी दिला जातो. या कालावधीत कागदपत्रे अपलोड न केल्यास त्यांची निवड महाडीबीडी फोन तर आपोआप रद्द होते. सोडतीद्वारे प्रत्येक तालुक्यातील निवड झालेल्या लाभार्थ्यांची आधी महाडीबीट पोर्टल प्रसिद्ध केली जाते.

अर्ज प्रक्रिया Shetkari Anudan yojana

राज्य सरकारने महाडीबीटी योजनेसाठी प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य ही पद्धत लागू केलेली आहे.त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक कृषी अधिकारी तालुक्याच्या पंचायत समिती कृषी विभाग किंवा जिल्हा परिषद कृषी विभागाशी संपर्क साधणे आवश्यक आहे. तुम्ही जर या योजनेत पात्र असाल,तुम्हाला दोन लाखांपर्यंत अनुदान सरकार देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *