लॅपटॉप अनुदान योजना मिळणार 30 हजार रुपये!Anudan yojana

Anudan yojana: बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रामध्ये डिजिटल साधनांची शक्यता निर्माण झाली. विशेष: वैद्यकीय व अभियांत्रिकीय अभ्यासक्रमांमध्ये ऑनलाईन नोट्स प्लॅटफॉर्म , प्रयोगशाळा व विविध किंवा मेडिकल सॉफ्टवेअर वापरणे आवश्यक झाले आहे.योजना केवळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदतच करत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात प्रगती करण्याची संधी देखील निर्माण करून देण्यात आले आहे.

Anudan yojana
Anudan yojana

योजनेमुळे हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज होतील. बऱ्याच वेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक घेण्यासाठी पैसे नसतात.अशावेळी जिल्हा परिषद फंडातून लॅपटॉपसाठी अनुदान देत आहे. जिल्हा परिषद सेस फंडातून 20% मागास वर्गीय कल्याण निधी मधून योजना राबवली जात आहे.अनेक जिल्हा परिषद मध्ये योजनेतून लाभ दिला जात आहे. सध्या मात्र,हिंगोली जिल्हा जिल्हा परिषद वतीने लॅपटॉप अनुदान योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहे.

लॅपटॉप अनुदान योजना अर्ज करण्याचा कालावधी Anudan yojana

जिल्हा परिषद लॅपटॉप अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारीख 25 जून होती.मात्र,त्यानंतर योजनेस मुदतवाढ देण्यात आली,असून 31 जुलै 2025 नवीन तारीख देण्यात आलेली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी लवकर म्हणजेच 31 जुलै 2025 च्या अर्ज सादर करावे. जेणेकरून अर्जाचा लाभ घेता येईल लॅपटॉप अनुदान योजनेचा प्रस्ताव तालुक्यातील पंचायत समिती किंवा जिल्ह्यातील समाज कल्याण विभागात मिळणार आहे .

मुलांना मिळणार मोफत लॅपटॉप!

योजनेचे लाभार्थी कोण आहे?Anudan yojana

लॅपटॉप अनुदान योजनेचा लाभ खालील प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती ,विमुक्त जाती, भटक्या जमाती,इतर मागासवर्ग.

ओपन प्रवर्गातील विद्यार्थ्यांना योजनेसाठी अर्ज नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असणे महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषद हिंगोली लॅपटॉप अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विहित नमुन्यातील प्रस्ताव पंचायत समिती, किंवा हिंगोली येथील जिल्हा समाज कल्याण यांचाकडे पूर्ण भरलेले प्रस्ताव सादर करायचे आहे.

आवश्यक कागदपत्रे कोणती?Anudan yojana

लॅपटॉप खरेदीचे मूळ बिल,आधार कार्डची झेरॉक्स, जातीचा दाखला,सध्या शिक्षण घेत असल्याचे प्रमाणपत्र ,बोनाफाईड, बँक पासबुक झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे योजनेसाठी लागणार आहे.

योजनेच्या आवश्यक अटी खालील प्रमाणे Anudan yojana

अर्जदार विद्यार्थी हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा. विद्यार्थी वैयक्तिक अभियांत्रका इतर पदवी पदव्यतिरिक्त शिक्षण घेत असावा. लॅपटॉप खरेदीनंतर प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबतच लॅपटॉप खरेदीचे मूळ खरेदी बिल जोडणे बंधनकारक आहे.विद्यार्थ्यांनी आपला प्रस्ताव कार्यालयीन वेळेत गट विकास अधिकारी पंचायत समिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली येथे सादर करावा.

लॅपटॉपसाठी अनुदानचे स्वरूप Anudan yojana

विद्यार्थ्यांनी लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी पंचायत समिती किंवा जिल्हा समाज कल्याण कार्यालय येथे सविस्तर माहिती जाणून घेण्यात अत्यंत आवश्यक आहे.लॅपटॉप खरेदी करावा लॅपटॉप साठी जास्तीत जास्त तीस हजार रुपये अनुदान मिळते.समजा विद्यार्थ्यांचे जर 26 हजार रुपये लॅपटॉप खरेदी केले ,तर त्याला अनुदान 26 हजार रुपये अनुदान मिळते. मात्र या ऐवजी 35 हजार रुपयांचे लॅपटॉप खरेदी केले, तर तीस हजार रुपये मिळणार कारण या योजनेसाठी अनुदानाची कमाल मर्यादा 30 हजार रुपये एवढी आहे.

लॅपटॉप योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?Anudan yojana

योजनेचा लाभ पात्र विद्यार्थी लॅपटॉप खरेदी केल्यानंतर मूळ बिल सादर केल्यास खरेदी किती प्रमाणे पण कमाल 30000 पर्यंतचे अनुदान बँक खात्यात जमा केले जाते अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे मुदतपूर्वी 25 जून होती परंतु आता वाढवण्यात आली आहे.

अर्ज कसा करायचा Anudan yojana

विद्यार्थ्यांनी लॅपटॉप खरेदी करून त्यांचे मूळ बिल आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव गट विकास अधिकारी ग्रामपंचायत समिती वा जिल्हा कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे प्रत्यक्षात सादर करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *