Sarkari yojana: आजच्या काळात शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने आहे. त्यापैकी एक मोठे आव्हान म्हणजे वन्य प्राण्यांकडून होणारे, शेतीचे नुकसान दुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना समस्येची सामना करावा लागतो.समस्येचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे.

तार कुंपण अनुदान योजना योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेती भोवती सुरक्षात्मक कुंपण बांधण्यासाठी आर्थिक मदत प्रदान करण्यात आली आहे.
योजनेची ओळख व उद्दिष्टे Sarkari yojana
तार कुंपण अनुदान योजना ही योजना डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्पांतर्गत राबवली जात आहे. योजनेचा मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राणी व पाळीव प्राणी जनावरांपासून संरक्षण करणे आहे. मराठवाडा वगळता इतर प्रदेशातील विशेष दुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना योजनेचा विशेष फायदा होतो.
वन क्षेत्राजवडील शेत व डोंगराळ भागातील शेत जमिनींवर वन्य प्राण्यांचे आक्रमण हे एक सामान्य समस्या हत्ती,डुक्कर, वनर,सांबर, हरीण यांसारखे प्राणी शेतातील पिकांचे मोठे नुकसान करता शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान होते.त्यांची आर्थिक स्थिती बिघडत असते.
अनुदानाचे प्रमाण व लाभ Sarkari yojana
योजनेअंतर्गत शासन शेतकऱ्यांना जवळपास 90% पर्यंत अनुदान प्रदान करते. अनुदान काटेरी तार कुंपण बांधण्यासाठी दिले जात आहे. शेतकऱ्यांना फक्त दहा टक्के रक्कम स्वतःच्या हिश्यातून भरावी लागते.त्यासाठी खूप फायदेशीर आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला दोन क्विंटल लोखंडी काटेरी तार व 30 खांब पुरवले जातात.साहित्य त्यांच्या शेताभोवती मजबूत कुंपण बांधण्यासाठी पुरेसे असते. कुंपणामुळे वन्य प्राणी शेतात प्रवेश करत नाही.व पिकांचे नुसकान होत नाही.
योजनेचा अटी व शर्ती Sarkari yojana
योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी व शर्ती आहे. भूमीची स्थिती: अर्जदार शेतकऱ्यांची शेती अतिक्रमामुक्त असणे आवश्यक आहे. तसेच निवडलेले क्षेत्र वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात असणे. वापराची हमी: शेतकऱ्यांनी पुढील दहा वर्षासाठी संबंधित जमिनीचा वापर केवळ शेतीसाठीच करण्याचा ठराव समितीकडे सादर करावा लागतो. नुसकानीचे प्रमाणपत्र: वन्य प्राण्यांकडून होत ,असलेल्या शेती पिकांच्या नुकसानी बाबत ग्रामपंचायत विकास समिती उपयुक्त वन्य व्यवस्थापन समिती वन्यपरीक्षेत्रावर आधारित यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे Sarkari yojana
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना संबंधित पंचायत समितीमध्ये विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागतो.अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. जमिनीच्या मालकीचे हक्काचे कागदपत्र, आधार कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुक,वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीचे प्रमाणपत्र, शेती केवळ शेतकामासाठीच वापराचा ठराव. ही कागदपत्रे योजनेसाठी आवश्यक आहे.
योजनेचे फायदे Sarkari yojana
आर्थिक बचत: 90 टक्के अनुदानामुळे शेतकऱ्यांची आर्थिक भर कमी होतो. त्यांना स्वस्त दरात कुंपण मिळते. पिकांचे संरक्षण: मजबूत तार कुंपणामुळे वन्य प्राणी शेतात प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान थांबते. उत्पादन वाढ: नुकसान कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढते,त्यांचे उत्पन्न सुधारते. मानसिक शांती: शेतकऱ्यांना आपल्या पिकांची चिंता करावी लागत नाही.त्यामुळे त्यांना मानसिक शांती मिळते.
योजनेच्या मर्यादा Sarkari yojana
योजना केवळ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आली, मराठवाडा क्षेत्रातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही .योजनेचा लाभ घेतल्यानंतर शेतकऱ्यांना दहा वर्षापर्यंत जमीन केवळ शेतीसाठीच वापरावी लागते. योजनेच्या यशामुळे शासन यांसारख्या अधिक योजना आणू शकत आहे. तसेच योजनेचा विस्तार इतर भागांमध्ये देखील होऊ शकतो.शेतकऱ्यांच्या मागणी नुसार योजनेत सुधारणा देखील केल्या जाऊ शकतात.
तार कुंपण अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी खरोखरच एक वरदान आहे.योजनेमुळे वन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान कमी होते.व शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारते, इच्छुक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतीचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
Shirsath Mala (Vasti ), At post Jambut Budruk, Taluka :- Sangamner, District :- Ahmednagar, Nearby Sakur, Maharashtra pin 422622
मुक्काम पोस्ट औलकोंडा तालुका उदगीर जिल्हा लातूर