Ladaki bahin yojana: लाडक्या बहिणींना एक लाख रुपये कर्ज मिळणार आहे. त्यांना काय करावे लागेल, कागदपत्र काय लागणार आहे. अर्ज कसा करावा लागेल. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आहे.

संपूर्ण माहिती Ladaki bahin yojana
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे राज्यातील लाडक्या बहिणींना गोरगरीब महिलांना जर व्यवसाय करायचा असेल, तर सरकार आता लाडक्या बहिणींना एक लाख रुपये कर्ज देत आहे.
महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी राज्य सरकारच्या वतीने महिलांना स्वालंबी बनवण्यासाठी व त्यांच्या व्यवसायाचा आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आलेली आहे.योजनेअंतर्गत पात्र महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
योजनेच्या परिचय व उद्देश Ladaki bahin yojana
लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे कर्ज विशेष: त्या महिलांना आहे .ज्यांच्यात व्यवसाय करण्याची तीव्र इच्छा आहे.परंतु ज्यांच्याजवळ पुरेसे भांडवल नाही.योजनेचा मुख्य हेतु तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे. व त्यांना स्वातंत्र्य व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे आहे.
राज्य सरकारचा असा विश्वास आहे, की महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणातून संपूर्ण कुटुंबाची व समाजाची प्रगती होऊ शकते. योजनेद्वारे महिलांना केवळ आर्थिक सहाय्य मिळणार नाही, तर त्यांचा आत्मविश्वास वाढून समाजात एक नवीन ओळख निर्माण होते.
कर्जाची रक्कम व अटी Ladaki bahin yojana
अभिनव योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दहा हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयापर्यंत कर्ज मिळते. कर्जाची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे संपूर्णपणे बिनव्याजी असणार आहे.म्हणजेच कर्जदारांना कोणत्याही व्याज भरावे लागत नाही. कर्जाची रक्कम महिलेच्या व्यवसायाच्या स्वरूपावर व तिच्या आवश्यकतेनुसार ठरली जाणार आहे. उदाहरणार्थ, छोट्या प्रमाणावर घरगुती व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलेला कमी रक्कम लागू शकते. तर मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करणाऱ्या जास्त रकमेची गरज असते.
योजनेची सद्यस्थिती Ladaki bahin yojana
सध्या योजना मुंबई जिल्ह्यात मध्यवर्ती सरकारी बँकेद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. बँक या योजनेची पायलट प्रकल्प म्हणून सुरू केलेली आहे. असून पुढे इतर जिल्ह्यांमधील बँका व राष्ट्रीयकृत बँका देखील योजनेत सहभागी होण्याची शक्यता.
राज्य सरकारच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, ओबीसी महामंडळ यांसारख्या विविध महामंडळाशी या योजनेचा संबंध जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. व्याज परतावा करण्याचे काम करतात, ज्यामुळे लाभार्थ्यांना अधिक सुविधा मिळू शकते.
अर्ज प्रक्रिया Ladaki bahin yojana
योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी आपल्या प्रक्रियेच्या पालन करावे. सर्वप्रथम, अर्जदाराला मुंबई जिल्ह्यातील मध्यवर्ती सरकारी बँकांना भेट द्यावी लागेल. व्यवसायासाठी आवश्यक मशिनरी उपकरणे किंवा कच्चामाल यांचा कोटेशन आणावे लागते. व्यवसायासाठी जागा भांडे घ्यायची असेल, तर त्यांना करार देखील आवश्यक असेल.
तुमच्या व्यवसायाचा एक स्पष्ट आराखडा तयार करावा लागेल, व्यवसायाचे स्वरूप अपेक्षित खर्च, उत्पन्नाच्या अंदाज भविष्यातील योजना यांचा समावेश असावा.बँकेतील अधिकारी तुमच्या व्यवसायाच्या व्यवहारात पडताळणी करून योग्य ती कर्जाची रक्कम मंजूर करतात.
आवश्यक कागदपत्रे Ladaki bahin yojana
आधार कार्ड,पॅन कार्ड,आर्थिक व्यवसायासाठी बँक पासबुक खाते ,तपशीलसाठी पासपोर्ट फोटो, अधिकृत नोंदणीसाठी चालू मोबाईल नंबर, संपर्कासाठी व्यवसायाच्या तपशीलवर आराखडा आवश्यक आहे.
पात्रता
सध्या योजना केवळ मुंबई जिल्ह्यातील रहिवाशांसाठी उपलब्ध आहे.अर्जदार महिलेला लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी असणे आवश्यक आहे.
व्यवसाय करण्याची इच्छा व त्यासाठीची स्पष्ट योजना असणे गरजेचे आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबातील महिलांना प्राधान्य दिले जाते. सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले, की या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील लागू करण्यात येईल. अधिकृत बँका व सरकारी बँकांना योजनेत सहभागी करून घेण्याची तयारी सुरू आहे.
योजनेमुळे महाराष्ट्रातील हजारो महिलांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते. त्यांच्या आर्थिक जीवन सुधारते.केवळ महिला सक्षमीकरणाचे साधन नाही ,तर राज्याच्या आर्थिक विकासालाही हातभार लागतो.
लाडकी बहीण योजना कर्ज ही महाराष्ट्र सरकारची एक प्रशासनीय पहल आहे. योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळते. व समाजात एक सक्षम व्यक्तिमत्व निर्माण करून शकतील.सध्या ही योजना मुंबईमध्ये सुरू झालेली आहे.लवकरच ती संपूर्ण राज्यात विस्तारित होणार आहे. योजनेचा लाभ घ्या.
At post office Harsul Digress