Gharkul yojana Anudan List:शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल, तुमच्या घरात मंजुरी मिळाली असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ग्रामीण भागातील घरकुल योजनेसाठी पैसे वितरित करण्यासाठी राज्य सरकारने तीन महत्त्वाच्या शासकीय निर्णय जीआर जरी केले आहे. त्यामुळे आता घरकुल योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता लवकरच लभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

केंद्र व राज्य सरकारकडून निधीच मंजूर Gharkul yojana Anudan List
केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2025- 26 साठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण साठी निधी मंजूर केला आहे .हा निधी सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी स्वातंत्रपणे मंजूर करण्यात आला आहे. यामुळे आता या तिन्ही प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून हे पैसे पाठवण्यात आले आहे. त्यामुळे या निधीचे लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. ही माहिती खूपच महत्त्वाची आहे. गरजू पर्यंत नक्की शेअर करा. जेणेकरून तुम्हाला अधिक फायदा होईल. या योजनेचा लाभ घ्या.